महाराष्ट्रातील “हा” नेता होणार काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष ?

महाराष्ट्रातील “हा” नेता होणार काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष ?

नवी दिल्ली – राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा तिढा अजून सुटलेला नाही. राहुल गांधी यांच्या नकारानंतर प्रियंका गांधी यांचं नाव काँग्रेसच्या काही नेत्यांकडून पुढे करण्यात आलं. मात्र गांधी कुटंबातील अध्यक्ष नको या भूमिकेवर राहुल गांधी ठाम राहिले. त्यामुळे अध्यक्ष कोण याचं भिजत घोंगड कायम आहे. सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावावर चर्चा झाली. मात्र त्यावर निर्णय होऊ शकला नाही.

आता मात्र अध्यक्षपदाचा तिढा सुटला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूूल वासनिक यांची अध्यक्षपदावर वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची उद्या म्हणज्येच शनिवारी बैठक होणार आहे. त्यामध्ये वासनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुकुल वासनिक हे गांधी कुटुंबियांचे अत्यंत विश्वासू सहकारी समाजले जातात. दलित नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.

दलित आणि मुस्लिम ही काँग्रेसची पारंपरिक व्होटबँक समजली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून दलित मतदार काँग्रेसपासून दूर गेला आहे. ही व्होटबँक पुन्हा मिळवण्यासाठी वासनिक यांच्याकडे अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याची चर्चा आहे. याच मुद्दावरुन सुशिलकुमार शिंदे यांच्या नावाचीही चर्चा काही दिवसांपूर्वी होती. मात्र त्यामध्ये शिंदे यांचं वय आडवं आल्याचं बोललं जातंय.  वासनिक हे 59 वर्षांचे आहेत. वासनिक यांनी यापूर्वी केंद्रात मंत्रिपद भूषवलं आहे. तसंच एनएसयूआयचे तसंच युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे. अनेक राज्याचं प्रभारीपद त्यांनी भूषवलं आहे. अत्यंत कमी वयात ते खासदार झाले होते. त्यामुळे सरकार आणि संघटनेमध्ये काम केल्याचा मोठा अनुभव वासनिक यांच्या पाठिशी आहे.

COMMENTS