नवी दल्ली – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती आहे. आज दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी- वढेरा आणि काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दर्शवल्याचे माहिती आहे. तसेच राहुल गांधी यांनी आपला राजीनामा सोपवला असल्याचं बोललं जात होतं परंतु अद्याप त्यांनी औपचारिकरित्या राजीनामा सादर केलेला नसल्याचं काँग्रेस प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
Sources: Congress President Rahul Gandhi offers his resignation at CWC, but it has not been accepted by the Committee. pic.twitter.com/Imw1m4ypbQ
— ANI (@ANI) May 25, 2019
दरम्यान या लोकसभा निवडणुकीत १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला असला तरी परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली असले तरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षाला काठावर बहुमत मिळालेले आहे.
Congress’ Randeep Singh Surjewala clarifies reports of Congress President offering his resignation are incorrect. CWC meeting going on. pic.twitter.com/wszSULWPe0
— ANI (@ANI) May 25, 2019
तसेच उत्तर प्रदेशच्या २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पराभव पत्करावा लागला होता.पक्षाध्यक्ष या नात्याने राहुल यांचे नेतृत्व सतते अपयशी ठरत असल्याने पक्षासमोर संघटनात्मक पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे.
Delhi: More visuals from Congress Working Committee(CWC) meeting at party office pic.twitter.com/0yiA3eOx1i
— ANI (@ANI) May 25, 2019
COMMENTS