नाशिक – घरपट्टी थकवल्याप्रकरणी काँग्रेस कार्यालयाला महापालिकेनं नोटीस पाठवली आहे. काँग्रेसच्या शहर जिल्हा कमिटीनं महापालिकेची एकूण 26 लाख 63 हजार रुपयांची घरपट्टी थकवली आहे. त्यामुळे महापालिकेनं या कार्यलयाचा लिलाव करण्यासाठी नोटीस पाठवली असून कार्यालयाचा जाहीर लिलाव टाळण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर वर्गणीतून पैसा गोळा करण्याची वेळ आली आहे. वारंवार सूचना देऊनही मालमत्ता कर जमा न केल्याने महापालिकेच्या विविध कर विभागाने काँग्रेस कमिटीसह शहरातील 394 अस्थापनांना जप्तीची नोटीस बजावली आहे. 21 दिवसात थकबाकी भरली नाही तर मालमत्तेचा लिलाव करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेश पातळीवर याबाबत माहिती दिली होती. मात्र वरिष्ठ पदाधिकारीकडून कान टोचण्यात आल्याने 26 लाख 63 हजार एवढी मोठी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न स्थानिक पदाधिकाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे वर्गणी काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही स्थानिक पदाधिका-यांनी वर्गणी जमा कले असल्याची माहिती आहे.
COMMENTS