मुंबई – प्रभाग क्रमांक 32 मधील काँग्रेस नगरसेविका स्टेफी किणी यांच्या जातीच्या दाखल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाकडे सुनावणी झाली. स्टेफी किणी यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फेटाळले आहे. जात पडताळणी समितीच्या निर्णयाला या नगरसेवीकेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी या निर्णयाला दिलेली स्थगिती आज उठवली असून स्टेफी किणी यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याचा निकाल या न्यायमूर्तींनी दिला आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार गीता किरण भंडारी यांना नव्या वर्षात पालिकेत नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे. यामुळे पालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ आता 95 होणार आहे. गीता किरण भंडारी यांचे वकील वाय एस जहागिरदार आणि चिंतामणी भणगोजी यांनी काम पाहिले आहे.
COMMENTS