अकोला – बार्शीटाकळी नगरपंचायतीत त्रिशंकू स्थिती, नगराध्यक्षपद काँग्रेसकडे !

अकोला – बार्शीटाकळी नगरपंचायतीत त्रिशंकू स्थिती, नगराध्यक्षपद काँग्रेसकडे !

अकोला – बार्शीटाकळी नगरपंचायतीसाठी पहिली निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली आहे. काँग्रेसच्या महेफूज खान यांना पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे.या निवडणुकीत भाजप आणि भारिपचा पराभव करत महेफूज खान यांनी नगराध्यक्षपद मिळवलं आहे. एकूण १७ जागांवर घेण्यात आलेल्या या निवडणुकीत काँग्रेस ०६, भारिप-बमसं ०६, भाजपला दोन तर अपक्ष उमेदवार तीन जागांवर निवडून आले आहेत.

दरम्यान नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यात आला असू यात काँग्रेसचे महेफुज खान विजयी झाले आहेत. त्यांनी भारिप-बमसंचे नईमोद्दीन यांचा १६२२ मतांनी पराभव केला. काँग्रेसला ४९८६ मतं मिळाली. भारिप-बमसंच्या उमेदवाराला ३३६४ मत मिळाली. नगराध्यक्षपदाच्या अन्य उमेदवारांपैकी भाजपचे संजय इचे यांना १७४२, शिवसेनेचे गजानन आखाडे यांना ११८३ आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आलमगिर खान यांना ७१४ मतं मिळाली आहेत.

दरम्यान राज्यातील सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार बार्शीटाकळी ग्रामपंचायतची जागा नगरपंचायतने घेतली. त्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या या निवडणुकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मुस्लिम बहुल असलेल्या बार्शीटाकळीत काँग्रेस आणि भारिप-बमसं यांच्यातच थेट लढत पहायला मिळाली. त्यात दोन्ही पक्षाला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत.

 

COMMENTS