नवी दिल्ली – तेलंगणा विधानभा निवणुकीदरम्यान इव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे काँग्रेस नेते उत्तमकुमार रेड्डी यांनी म्हटले आहे. मला या निकालांवर संशय आहे. यासाठी आम्ही व्हीव्हीपॅटमशीमधील मतदानाच्या स्लिप तपासणार आहोत. कारण आम्हाला इव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा संशय आहे. आम्ही सर्व काँग्रेसचे नेते निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारही करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Hyderabad: Congress delegation submits a complaint to Telangana Chief Electoral Officer (CEO) Rajat Kumar raising suspicions that Electronic Voting Machines (EVMs) have been manipulated in the state. #AssemblyElections2018 pic.twitter.com/XTCL0Dcmnb
— ANI (@ANI) December 11, 2018
तेलंगणात पुन्हा एकदा के. चंद्रशेखर राव यांची तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. सध्याच्या अंदाजानुसार, टीआरएसने सर्वाधिक ९० जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसने या निकालांवर संशय व्यक्त केला आहे.
Telangana Pradesh Congress Committee's Uttam Kumar Reddy on #AssemblyElection2018 results: I am having doubts on results we're getting in Telangana ballot paper counting. We're doubting that tampering could have been done in EVMs. Slips should be counted in VVPATs. (File pic) pic.twitter.com/oqGpsaikjf
— ANI (@ANI) December 11, 2018
COMMENTS