राज्यातील काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार, “हे” असतील संभाव्य उमेदवार ?

राज्यातील काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार, “हे” असतील संभाव्य उमेदवार ?

मुंबई – राज्यातलं काँग्रेस आघाडीचं जागावाटपाचं घोडं अजून एकदोन जागेवरुन अडलं असलं तरी जिथे काही अडचण नाही अशा काही जागांवरील उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, मुंबई उत्तर मध्य मधून प्रिया दत्त,  नंदूरबारमधून के सी पाडवी, धुळ्यातून रोहिसाद पाटील, सोलापूरमधून सुशिलकुमार शिंदे, पुण्यातून संजय काकडे, रामटेकमधून मुकुल वासनिक, नागपूरमधून नाना पटोले, नांदेडमधून अमिता चव्हाण, हिंगोलीतून राजीव सातव, गडचिरोलीतून डॉ. नामदेव उसंडी, यवतमाळमधून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वर्धामधून चारुलता टोकस यांची नावं पहिल्या यादीत जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान अहमदनगरच्या जागेबाबतही आज निर्णय होण्याची शक्यता आहे. दिल्लीत आज काँग्रेसच्या स्रक्रिनिंग कमिटीची बैठक होणार आहे. त्यामध्ये काँग्रेसचे वरीष्ठ नेते अहमदनगरच्या जागेवाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बोलण्याची शक्यता आहे. दिल्लीतील आजच्या काँग्रसेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी भाजप प्रवेशाची हूल उठवल्याची चर्चा आहे. तिकीट मिळवण्यासाठीचे विखे यांचे दबावतंत्र असल्याचंही बोललं जातंय. सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS