मध्य प्रदेशात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा मार्ग मोकळा !

मध्य प्रदेशात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा मार्ग मोकळा !

मध्यप्रदेशात काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून सत्तास्थापनेसाठी ११६ ची मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे.या निवडणुकीत मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी काँग्रेसला ११४ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपाचा १०९ जागांवर विजय झाला असून समाजवादी पक्षाचा १, बहुजन समाज पक्षाचा २ आणि अपक्ष उमेदवारांचा ४ जागांवर विजय झाला आहे.

दरम्यान काँग्रेसच्या काही धोरणांशी आम्ही असहमत आहोत, मात्र तरीही मध्य प्रदेशात आम्ही त्यांना समर्थन देण्यास तयार झालो आहोत. गरज लागल्यास राजस्थानमध्येही समर्थन देऊ असं मायावतींनी म्हटलं आहे.

शिवराजसिंह चौहान यांना हादरा बसला असून या राज्यातील मतमोजणी जवळपास २४ तासांनी संपली. मध्य प्रदेश विधानसभेत सत्तास्थापनेसाठी ११६ ची मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. मात्र, एकाही पक्षाला ही मॅजिक फिगर गाठता आलेली नाही. काँग्रेस बहुमतापासून २ जागा दूर आहे. तर भाजपाला सत्तास्थापनेसाठी आणखी सात आमदारांचे पाठबळ लागणार आहे.

COMMENTS