काँग्रेसच्या स्वप्नांना सुरुंग, तीन राज्यात ‘माया’जाल !

काँग्रेसच्या स्वप्नांना सुरुंग, तीन राज्यात ‘माया’जाल !

नवी दिल्ली – आगमी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसनं देशभरातील सर्वच विरोधी पक्षांना एकत्रित घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला हरवयाचं असं स्वप्न काँग्रेसकडून पाहिलं जात आहे. परंतु काँग्रेसच्या या स्वप्नांना सुरुंग लागणार असल्याचं दिसत आहे. कारण बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावतींनी छत्तीसगढमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आणि नवीन पक्ष स्थापन केलेल्या अजीत जोगींशी हातमिळवणी केली आहे. तर मध्य प्रदेशातही त्यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मायावतींच्या या निर्णयामुळे महाआघाडी अडचणीत आली असून याचा फायदा भाजपला होईल असं बोललं जात आहे.

दरम्यान मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांमध्ये वर्षाअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या राज्यांत भाजपचे सरकार असून मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये भाजप गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसकडून बसपसोबत आघाडीचे प्रयत्न सुरु होते. मात्र, मायावतींनी अजीत जोगी यांच्याशी हातमिळवणी केल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

COMMENTS