नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र येणार असून राष्ट्रीय लोक दलालाही महाआघाडीत स्थान देण्यात येणार आहे. तर काँग्रेससाठी रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघातून उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला हा मोठा हादरा मानला जात आहे.
दरम्यान बसपा, सपा आणि राष्ट्रीय जनता दलाने महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी एका हिंदी वृत्तपत्राने दिली आहे.यानुसार बसपा ३८, समाजवादी पक्ष ३७ आणि राष्ट्रीय जनता दल ३ जागा लढवणार असल्याची माहिती आहे. तर रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघात काँग्रेसविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसला मोठा हादरा मानला जात आहे.
COMMENTS