31 ऑक्टोबरपासून राज्यात काँग्रेसचे जनआक्रोश आंदोलन !

31 ऑक्टोबरपासून राज्यात काँग्रेसचे जनआक्रोश आंदोलन !

मुंबई – राज्य सरकारची तीन वर्षांची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्तसाधून 31 ऑक्टोबरपासून जनआक्रोश आंदोलनाला सुरूवात केली जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या आंदोलनाला सुरूवात होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली.

            नोटबंदी मुळे लोकांना खूप त्रास झाला. देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नोटबंदी च्या निर्णयाला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे त्यादिवशी काळा दिवस पाळणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं. सांगलीत जाहीर सभेने जनआक्रोश आंदोलनाची सांगता होणार आहे.

            कर्जमाफी म्हणजे आकड्यांचा फसवा खेळ आहे. शेतक-यांचा हाती काही लागले नाही. अटी शर्ती घालून शेतक-यांना कर्जमाफीतून वगळले असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. राज्यात कर्जमाफी चा सावळा गोंधळ सुरु आहे असंही चव्हाण म्हणाले.  कापूस खरेदी साठी ऑनलाईन नोंदणीच्या सक्तीची अट तात्काळ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

COMMENTS