नवी दिल्ली – देशातील भाजप सरकारविरोधात काँग्रेनं आज जनआक्रोश रॅलीचं आयोजन केलं आहे. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, धार्मिक हिंसाचार तसेच महिलांवरील वाढते आत्याचार यातून जनतेमध्ये वाढलेला आक्रोश प्रकट करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतील रामलीला मैदानात आज राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते काँग्रसचे कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच मोठी जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान काँग्रेसच्या या रॅलीसाठी देशभरातून कार्यकर्ते दिल्लीत दाखल झाले आहेत. या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी आजच्या सभेत काय बोलणार आहेत याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS