जळगाव – आजपासून काँग्रेस पार्टीनं भाजप सरकारविरोधात जनसंघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याला सुरुवात केली आहे. फैजपूर येथे १९३६ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन झाले होते. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या याच भूमीतून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेते व पदाधिका-यांच्या उपस्थितीत जनसंघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याचा शुभारंभ झाला.
दरम्यान यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.वाढती महागाई, रुपयाची घसरण, इंधण दरवाढीमुळे जनतेचं कंबरडं मोडलं असून आगामी निवडणुकीत ही जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी जोरदार टीका प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
COMMENTS