मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा गुरुवारपासून नागपूर विभागात सुरु होणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण निर्माण झाले आहे.
जनसंघर्ष यात्रेचा हा पाचवा टप्पा असून यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि अमरावती विभागाचे चार टप्पे जनतेच्या प्रचंड प्रतिसादासह पूर्ण झाले आहेत. गुरुवार दि. १० जानेवारी रोजी सकाळी १०.०० वा. दिक्षाभूमी, नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ होईल. त्यानंतर ताजबाग आणि गणेश टेकडी येथे दर्शन घेऊन जनसंघर्ष यात्रेचा नागपूर विभागातील प्रवास सुरु होईल. दुपारी १२.०० वा. कामठी येथे जनसंघर्ष यात्रेचे भव्य स्वागत होणार असून दुपारी २.३० वा. रामटेक येथे पहिली जाहीर सभा होईल. त्यानंतर सायंकाळी ५.०० वा. तुमसर जि. भंडारा येथे यात्रेचे भव्य स्वागत होणार असून सायंकाळी ६.०० वा. तिरोडा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Nagpur Revised Jansangharsh Yatra Tour Programm.
शुक्रवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वा. गोंदिया, दुपारी २.०० वा. सडक अर्जुनी तर सायंकाळी ४.०० वा. साकोली जि. भंडारा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दि. १२ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वा. भंडारा, दुपारी २.१५ वा. चिमूर जि. चंद्रपूर येथे जाहीर सभा होणार आहेत तर सायंकाळी ५.०० वा. वरोरा येथे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत होणार असून सायंकाळी ६.०० वा. चंद्रपूर येथे रॅली व जाहीर सभा होणार आहे.
रविवार दि. १३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. गडचिरोली, दुपारी २.०० वाजता ब्रम्हपुरी येथे जाहीर सभा होणार असून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याची सांगता सभा सायंकाळी ६.०० वाजता नागपूर येथे होणार आहे.
या यात्रेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. नसीम खान यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. केंद्रातील आणि राज्यातील नाकर्त्या भाजप शिवसेना सरकारविरोधात जनतेच्या हक्कासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.
COMMENTS