काँग्रेसला धक्का, कर्नाटकातील सरकार कोसळलं !

काँग्रेसला धक्का, कर्नाटकातील सरकार कोसळलं !

मुंबई – कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसला धक्का बसला असून कर्नाटकातील कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं आहे. काँग्रेस-जेडीएस सरकार बहुमत चाचणीत अपयशी झालं असून बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने 99 तर विरोधात 105 मतं मिळाली आहेत. त्यामुळे आता भाजपचा सरकार स्थापनेचा मार्ग याठिकाणी मोकळा झाला आहे. कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमुळे पुढील 2 दिवस कर्नाटकात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

दरमेयान काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळल्याने थोड्याच वेळात येडियुरप्पा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी जाणार आहेत. काँग्रेस आणि जेडीएसच्या 16 आमदारांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात आलं होतं. कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी आमदारांना भाजपने पैसे दिल्याचा आरोप काँग्रेस नेते सिद्धरमैया यांनी केला आहे.

COMMENTS