मुंबई – राज्यातील माजी मंत्र्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच ते काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य देखील होते. याबाबत त्यांना नोटीसही पाठवण्यात आली होती परंतु नोटीसीकडेही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची काँग्रेस प्रदेश कमिटीने पक्षातून हकालपट्टी केली आहे.
दरम्यान नागपूर शहरातील काँग्रेसमधील बंडखोरीला खतपाणी घातल्याप्रकणी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून नागपूर शहर काँग्रेसमध्ये माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार विरुद्ध माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांच्यासमध्ये संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष मिटवण्याचा प्रयत्नही झाला, मात्र त्याला यश आलं नाही. नागपूर शहर काँग्रेस समितीला न जुमानता चतुर्वेदी यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरोधातही मोहीम उघडली होती. एवढंच नाही तर चतुर्वेदी यांच्या कार्यकर्त्याने नागपुरातील एका जाहीर कार्यक्रमात अशोक चव्हाण यांच्या अंगावर शाई फेकली होती. याप्रकरणी अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश चतुर्वेदी यांना पदावरून दूर करण्यासाठी दिल्लीत तक्रार केली होती. दरम्यान, चतुर्वेदींना पक्षाने नोटीसही बजावली होती, मात्र या नोटीसला त्यांनी मुदतीत उत्तर दिले नाही. अखेर दिल्लीतून चतुर्वेदी यांच्यावर कारवाई करण्यास हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
COMMENTS