उस्मानाबाद – काँग्रेसचा आणखी एक नेता शिवसेनेच्या गळाला लागला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. त्यांनी कालच आपल्या जिल्ह्याध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिला आहे. येत्या 3 तारखेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडून परंडा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडे जेवढे लक्ष द्यायला पाहिजे होते तेवढे दिले जात नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांची फरफट होत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान निवडणुकीपूरतच कार्यकर्त्यांचा वापर केला जात होता, असा आरोप चेडे यांनी वरिष्ठ नेत्यांवर केला आहे. त्यांच्यासोबत वाशी, भूम, परंडा या तिन्ही तालुकाध्यक्ष, वाशीचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, काही नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे काही पदाधिकारी शिवसेनेत जाणार आहेत. हा जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
COMMENTS