मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात उड्या घेत आहेत. परंतु औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच सत्तार यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. तसंच त्यानंतर त्यांनी आपण अपक्ष लढणार असल्याचंही जाहीर केलं होतं. परंतु आता अब्दुल सत्तार यांचं बंड थंड झालं असून ते पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान मी कुणावरही नाराज नाही. मी औरंगाबादमधून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मी काँग्रेसचा राजीनामा आधीच दिलेला आहे. आता काँग्रेस आमदार म्हणून बोलत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढत देणार आहे,’ अशी घोषणाही अब्दुल सत्तार यांनी केली होती. परंतु आज अखेर सत्तार यांनी माघार घेतली असल्याची माहिती आहे.
COMMENTS