विखे पाटलांसह काँग्रेसच्या ‘या’ पाच आमदारांवर पक्षाकडून होणार कारवाई ?

विखे पाटलांसह काँग्रेसच्या ‘या’ पाच आमदारांवर पक्षाकडून होणार कारवाई ?

मुंबई – लोकसभा निवडणुकीत पक्षविरोध काम केल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांसह काँग्रेसच्या पाच आमदारांवर पक्षाकडून कारवाई केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आमदार अब्दुल सत्तार, आमदार जयकुमार गोरे, आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर यांच्यावर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान काँग्रेसच्या या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाविरोधात भूमिका घेतली आणि विरोधी उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर  या नेत्यांवर कारवाई केली जाणार असून 10 मे रोजी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS