सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग,  काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची महत्त्वाची बैठक!

सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग, काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची महत्त्वाची बैठक!

नवी दिल्ली – राज्यात सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीत कालच्या बैठकीत ठरलेल्या मुद्द्यांवर राज्यातल्या इतरही नेत्यांना तपशीलवार माहिती दिली जाणार आहे. काल बैठकीला राज्यातून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसिम खान हे तीनच नेते उपस्थित होते.आत्ताच्या बैठकीत इतरही नेत्यांना समाविष्ट केले जाणार आहे.

दरम्यान ही बैठक झाल्यानंतर दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान शरद पवार यांच्या घरी एकत्रित बैठक होणार आहे. पवारांच्या घरी होणाय्रा बैठकीत खातेवाटप आणि कुणाला काय मिळणार या दृष्टीनं महत्त्वाची चर्चा केली जाणार आहे. दुपारी 2 ते साधारण आठ ते साडेआठ पर्यंत ही बैठक चालू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर आज रात्रीच सगळे नेते मुंबईला परतणार आहेत. त्यानंतर उद्या शिवसेनेसोबत बैठक घेण्यात येणार असून या बैठकीनंतर महत्त्वाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS