2019 च्या लोकसभा  निवडणुकीनंतर राजकीय निवृत्ती, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची घोषणा!

2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय निवृत्ती, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची घोषणा!

मुंबई – 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय निवृत्ती घेणार असल्याची घोषणा काँग्रेसच्या नेत्यानं केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तसंच केंद्रीय गृहमंत्रीपद आणि राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असेल, यानंतर मी कुठलीही निवडणूक लढवणार नसल्याचं शिंदे म्हटलं आहे . काल दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची मुदत संपण्यापूर्वी सुशीलकुमार शिंदेंनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली.

दरम्यान यावेळी शिंदेंनी  वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांना तिलांजली दिल्याची टीका त्यांनी केली. भाजपकडे कोणाताही विकासाचा अजेंडा नाही. जातीय कारणांमुळे भाजपाने सिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी दिली, असल्याचा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी प्रचाराचा तोफा काल थंडावल्या. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे उद्या मराठवाड्यातल्या 6, विदर्भातल्या 3 आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूरमध्ये मतदान होणार आहे.

COMMENTS