काँग्रेसनं पंतप्रधानपदाचा हट्ट सोडला, या नेत्याचं मोठ वक्तव्य ।

काँग्रेसनं पंतप्रधानपदाचा हट्ट सोडला, या नेत्याचं मोठ वक्तव्य ।

नवी दिल्ली – काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या तर पंतप्रधानपदाचा विचार करेन, असं वक्तव्य काँग्रेसचे अध्य राहुल गांधींनी केलं होतं. परंतु आता काँग्रेसनं पंतप्रधानपदाचा हट्ट सोडला असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. काँग्रेसला पंतप्रधानपद नाही मिळालं तरी चालेल, पण एनडीएला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे,’ असं आझाद यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा रंगली आहे.

दरम्यान मोदींना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. त्यांनी स्वत: सर्वांना वैयक्तीक पत्र लिहले आहे. इतकच नव्हे तर जे पक्ष UPA आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)चा भाग नाहीत त्यांना देखील सोनिया गांधी यांनी पत्र लिहले आहे.सोनिया गांधी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी 23 मे रोजी होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

COMMENTS