नागपूर – राज्यात सत्तास्थापन करण्याबाबत काँग्रेस नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार झाला असून राज्यातील नेत्यांचं एकमत आहे. हा ड्राफ्ट लवकरच हायकमांडकडे पाठवला जाणार आहे. महासेनाआघाडीच्या मसुद्याबाबत दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी अंतिम निर्णय घेणार आहेत. हायकमांड मसुद्यात काय बदल करायचे असेल त्या सूचना देतील. असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
दरम्यान महासेनाआघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होईल, त्याबाबत आम्हाला आनंद आहे. भाजपने शब्द फिरवल्याने शिवसेनेने काडीमोड घेतला. भाजपने शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्यायला हवं होतं. मेहबुबा मुफ्तीसोबत जाऊ शकता, मग शिवसेनेसोबत का नाही? तसेच शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव होता.असही वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.
COMMENTS