नवी दिल्ली – काँग्रेस आमदारानं भर कार्यक्रमात नोटा उधळल्या असल्याचं समोर आलं आहे. गुजरात काँग्रेसचे नेते आणि दलित आमदार अल्पेश ठाकोर यांनी या नोटा उधळल्या आहेत. याबाबतचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून एका कार्यक्रमात ठाकोर हे पैसे उडवताना दिसत आहेत. गुजरातमधील पाटण येथील एका कार्यक्रमात त्यांनी या नोटांची उधळण केली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ठाकोर यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
#WATCH: Gujarat Congress leader Alpesh Thakur showers money at a devotional programme in Patan. #Gujarat (16.6.2018) pic.twitter.com/hjVKK4wpPa
— ANI (@ANI) June 18, 2018
दरम्यान राधनपूरमध्ये मुलींसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी देणगी गोळा केली जात असून ही देणगी गोळा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु या कार्यक्रमात सहभागी झालेले राधनपूरचे काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर आणि अन्य कार्यकर्त्यांनी पैसे उधळले असल्याचं दिसून आलं आहे. परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटांसंबंधी जारी केलेल्या अटी व नियमांनुसार, नोटांचा वापर हार बनवण्यासाठी, सजावटीसाठी आणि कोणत्याही कार्यक्रमात उडवण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस आमदारांनीच हा नियमांचा भंग केल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार टीका केली जात आहे.
COMMENTS