ट्रेनच्या टॉयलेटमध्ये दीड तास अडकले काँग्रेस नेते !

ट्रेनच्या टॉयलेटमध्ये दीड तास अडकले काँग्रेस नेते !

नवी दिल्ली – ट्रेनच्या टॉयलेटमध्ये जवळपास दीड तास काँग्रेस नेते अडकले असल्याची घटना घडली आहे. रेल्वेतून प्रवास करत असताना जवळपास दीड तास मध्य प्रदेश काँग्रेस कमेटीचे नेते चंद्रिका प्रसाद दिवेदी हे शताब्दी एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये फसले होते. चंद्रिका प्रसाद दिवेदी ज्या डब्यातून प्रवास करत होते त्या टॉयलेटची कडी अचानक जाम झाली. त्यामुळे त्यांना बराच वेळ टॉयलेटमध्ये काढावा लागला. दिवेदी यांनी मदतीसाठी आवाज दिला परंतु कोणीच मदतीला आलं नाही. त्यामुळे दिवेदी यांनी मुलाला फोन लावून सर्व घटना सांगितली.

दरम्यान त्यानंतर त्यांच्या मुलाने रेल्वे हेल्पलाइन नंबर 139 वर कॉल केला पण त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही. त्य़ानंतर त्यांनी रेल्वेचा टोलफ्री नंबर 1512 वर कॉल केला आणि जवळपास अर्ध्या तासानंतर संध्याकाळी 4.50 मिनिटांनी ललितपूर जीआरपीशी संपर्क झाला. यानंतर जीआरपीने ट्रेनमध्ये असणाऱ्या टेक्निकल टीमला याची माहिती दिली. त्यानंतर या टीमनं त्यांना टॉयलेटमधून बाहेर काढलं. ट्रेनच्या टॉयलेटचा दरवाजा जाम झाल्यामुळे दिवेदी यांना चांगलाच मनस्ताप झाला असल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS