मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठ्ठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पाटील यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून स्वतः हर्षवर्धन किंवा त्यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार असू शकतात असा ँदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल पण इंदापूरमधून दत्तात्रय भरणे हेच लढणार अशी भूमिका
अजित पवार यांनी घेतली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. त्यानंतर इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसला न सोडण्याचा अजित पवारांनी निश्चय केला आहे.त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे अस्वस्थ असून ते भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS