काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर, राज्यसभेवर जाणार ?

काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर, राज्यसभेवर जाणार ?

नवी दिल्ली – काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. शिंदे यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.एकीकडे मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच ज्योतिरादित्य शिंदे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान मध्य प्रदेश विधानसभेचं अधिवेशन 15 मार्चपासून सुरू होत आहे. अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भाजप अविश्वास प्रस्ताव सादर करुन काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक असलेल्या मध्य प्रदेश काँग्रेसमधील 17 आमदारांनी बंडाचा पवित्रा घेत बंगळुरू गाठलं आहे. या आमदारांमध्ये कमलनाथ सरकारमधील 6 मंत्र्यांचाही समावेश आहे. 16 मार्चला विधानसभेच्या पहिल्या सत्रात भाजपकडून अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो. या आमदाराच्या समर्थनाच्या जोरावर काँग्रेसचं सरकार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न असणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसच्या अडचणीत मोठी वाढ झाली अस्याचं दिसत आहे.

COMMENTS