मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण सांगलीतील काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. भाजप नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि काँग्रेसचे प्रतीक पाटील यांची भेट झाली आहे. मात्र ही भेट राजकीय कारणासाठी झाली नसल्याचं प्रतीक पाटील यांनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीने आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपात एन्ट्री मारली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का बसला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS