सातारा – काँग्रसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण चव्हाण यांचे समर्थक आमदार आनंदराव पाटील यांचे पुत्र आणि पुतणे आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुतणे सुनील पाटील आणि पुत्र प्रताप पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे साताय्रात काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच आमदार आनंदराव पाटील यांचे पुतणे सुनील पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे हे दोन्ही नेते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. ही चर्चा अखेर खरी ठरली असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून मतभेदामुळे दुरावलेले आमदार आनंदराव पाटील यांचे पुतणे सुनील पाटील आणि पुत्र प्रताप पाटील हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.
काट्यानेच काटा काढावा लागतो, तरच 145 ची मॅजिक फीगर गाठणे शक्य होणार – अजित पवारhttps://t.co/H7ogGOJrX8 pic.twitter.com/uZ8qUE53wj
— Mahapolitics (@Mahapoliticsnew) September 22, 2019
भाजपला मोठा धक्का, 'या' नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश! VIDEOhttps://t.co/Q0kcwqzhRo pic.twitter.com/UFNAo0MK2Z
— Mahapolitics (@Mahapoliticsnew) September 23, 2019
COMMENTS