मुंबई – लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसत आहे. नागपूर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुशांत चौधरी शिवसेनेत प्रवेश करणार असल्य़ाची माहिती सूत्रांनी दिली आहे.दुशांत चौधरी हे नागपूर विद्यापीठचे सिनेट सदस्य असून रविवारी दुपारी 4 वाजता ते मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान विदर्भातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्यावर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. शहर काँग्रेसने त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरणही मागितलं होतं. मात्र, चतुर्वेदी यांनी मुदत संपूनही स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळं काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी आपला अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे पक्षावर नाराज असलेले दुशांत चौधरी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर नागपूरमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS