काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, राहुल गांधींच्या घरी सोनिया, प्रियांका गांधी यांच्यात चर्चा !

काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, राहुल गांधींच्या घरी सोनिया, प्रियांका गांधी यांच्यात चर्चा !

नवी दिल्ली – तीन राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरु झाला असल्याचं दिसत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु असल्याची माहिती आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री म्हणून अशोक गहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे, तर मध्यप्रदेशात कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते असं बोललं जात आहे. या दोन्ही निर्णयांमुळे सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया नाराज असून त्यामुळेच या दोघांचे समर्थक विरूद्ध इतर काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात वाद सुरु असल्याची माहिती आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी गेल्या होत्या. यादरम्यान त्यांनी चर्चा केली असल्याची माहिती आहे.

दरम्यान कमलनाथ यांचं नाव निश्चित झाल्याने मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया कार्यकर्ते नाराज झाले असल्याची माहिती आहे. उत्तरेत भोलेनाथ मध्यप्रदेशात कमलनाथ अशाही घोषणा दिल्या जात आहेत. अशात ज्योतिरादित्य सिंधिया यांना मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. राजस्थानातही सचिन पायलट यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरु केली आहे. त्यामुळे हा अंतर्गत वाद आता राहुल गांधी कसा मिटवणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS