तुम्हाला काँग्रेसचं विधानसभेचं तिकीट हवय, मग ‘या’ अटी पूर्ण कराव्याच लागतील !

तुम्हाला काँग्रेसचं विधानसभेचं तिकीट हवय, मग ‘या’ अटी पूर्ण कराव्याच लागतील !

मध्य प्रदेश – आगामी निवडणुकीसाठी जर तुम्हाला उमेदवारी मिळवायची असेल तर काँग्रेस पक्षानं आपल्या उमेदवारांपुढे काही अटी ठेवल्या आहेत. त्या अटींची पूर्तता झाली तरच त्यांना काँग्रेसकडून तिकीट दिलं जाणार आहे. याबाबत मध्य प्रदेश काँग्रेसनं पत्रक काढलं असून त्यामध्ये काही अटी दिल्या आहेत. सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक, वॉस्टअप, आणि ट्वीटरवर ऍक्टीव्ह असणं गरजेचं आहे. तसेच फेसबुक पेजवर 15 हजार लाईक्स, ट्वीटरवर 5 हजार फॉलोअर आणि आपल्या प्रत्येक प्रभागातील एक वॉट्सअप ग्रुप असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच मध्य प्रदेश काँग्रेसच्या ट्वीटरवर अकाऊंटवर रिट्वीट आणि लाईक, तसेच पक्षाच्या फेसबूक पेजवरील सर्व पोस्ट शेअर करणे आणि त्या लाईक करणे बंधनकार करण्यात आलं आहे. तसेच याबाबतची सर्व माहिती पक्षाच्या प्रदेश कार्यालयात 15 सप्टेंबरपर्यंत देण बंधनकारक करण्यात आलं आहे.

दरम्यान आगामी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षानं सोशल मीडिवार जास्त फोकस केलं असल्याचं दिसत आहे. याची सुरुवात मध्य प्रदेशमधून केली जात असली तरी लवकरच महाराष्ट्र आणि इतर राज्यातही याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या देशभरातील नेते आणि कार्यकर्त्यांना आता जास्तीत जास्त सोशल मीडियावर ऍक्टीव्ह राहणं गरजेचं आहे.

 

COMMENTS