काँग्रेस कार्यकारिणीचे पुर्नगठन, या नेत्यांना कार्यकारिणीत स्थान तर सोनिया गांधींना सहाय्य करण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन !

काँग्रेस कार्यकारिणीचे पुर्नगठन, या नेत्यांना कार्यकारिणीत स्थान तर सोनिया गांधींना सहाय्य करण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन !

मुंबई – काँग्रेस कार्यकारिणीचे पुर्नगठन करण्यात आले असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सहाय्य करण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांचे कार्यकारिणीत स्थान कायम आहे. आझाद आणि शर्मा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. त्यांनी जाहीरपणे पक्षासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. यावरून कार्यकारीणी बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. परंतु तरीही त्यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.

दरम्याम काॅंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सहाय्य करण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत खालील नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे.

१. ए के अँटोनी

२. अहमद पटेल

३. अंबिका सोनी

४. के सी वेणुगोपाल

५. मुकूल वासनिक

६. रणदीप सिंह सुरजेवाला

तसेच गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे, मोतीलाल वोरा यांना महासचिव पदावरून काढले असून रणदीप सुरजेवाला यांना महासचिव केले आहे.

तसेच एच के पाटील यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारीपद देण्यात आले आहे. तर काँग्रेसच्या ३ मराठी नेत्यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये राजीव सातव यांच्याकडे गुजरातचे प्रभारीपद देण्यात आले आहे. तर रजनी पाटील यांच्याकडे जम्मु आणि कश्मीर आणि मुकूल वासनिक यांच्याकडे मध्य प्रदेशचे प्रभारीपद देण्यात आले आहे.

COMMENTS