नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांना एकत्रित करुन महाआघाडीसाठी प्रयत्न करणा-या काँग्रेसलाच विरोधकांनी हादरा देण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मातोश्री परदेशातून आल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, त्यामुळे पंतप्रधानपदासाठी मायावतींचे नाव बहूजन पक्षाने पुढे केलं असल्याची माहिती आहे. बहूजन पक्षाच्या या मागणीमुळे काँग्रेसलाच हादरा देण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिसत आहे.
दरम्यान कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या सरकार स्थापनेत मायावतींनी मोलाची भूमिका निभावली होती. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात मायावतींनी छाप पाडली असून नरेंद्र मोदी आणि अमित शहांना फक्त ‘दबंग’ मायावतीच रोखू शकतात, असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.सध्या बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुरु असून या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत पक्षाचे धोरणावर चर्चा करण्यात आली.यावेळी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक वीर सिंह आणि जयप्रकाश सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी मायावतींचे नाव पुढे केले असल्याची माहिती आहे. मायावतीच मोदींना टक्कर देऊ शकतात, असेही बसपने म्हटले आहे. बसपाच्या या भूमिकेमुळे आतापासूनच विरोधकांमध्ये मतभेद सुरु झाले असल्याचं दिसत आहे.
COMMENTS