आणखी एका राज्यात काँग्रेसची एकला चलोची भूमिका!

आणखी एका राज्यात काँग्रेसची एकला चलोची भूमिका!

नवी दिल्ली  उत्तर प्रदेशनंतर आता आणखी एका राज्यात काँग्रेसने एकला चलोची भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाशी आघाडी न करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. काँग्रेसचे आंध्र प्रदेशमधील प्रभारी ओमेन चांडी यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. लोकसभाच नाही तर विधानसभेसाठीही तेलुगू देसमशी निवडणूकपूर्व आघाडी होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

           दरम्यान काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाने नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत निवडणूकपूर्व आघाडी केली होती. पण तेलंगणा राष्ट्र समितीच्या के चंद्रशेखर राव यांच्या करिष्म्यापुढे आघाडीचे काहीही चालले नाही. दोन्ही पक्षांच्या निवडणूक पूर्व आघाडीमुळे दोघांचेही नुकसान झाल्याचं समोर आले. २०१४ मध्ये तेलुगू देसमकडे तेलंगणामध्ये १५ आमदार होते आता ही संख्या २ वर येऊन ठेपली आहे. तर काँग्रेसच्या आमदारांची संख्याही २१ वरून १९ वर आली आहे. त्यामुळे आता स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय काँगेसनं घेतला आहे.

          उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आपली स्वतंत्र आघाडी करण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील ८० जागांची वाटणी या दोन्ही पक्षांनी करून घेतली असून आता याठिकाणी काँग्रेसला स्वतंत्रपणे लढावे लागणार आहे.

COMMENTS