मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी युतीशी झुंज देण्यासाठी काँग्रेसची जोरदार तयारी सुरु आहे. यासाठी राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपविली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने त्यांच्या वाटय़ाला आलेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीशी समन्वय करून, प्रचारात आघाडी कशी घेता येईल याबाबतची तयारी केली आहे.
त्यासाठी वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेस लढवत असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य मित्र पक्षांशी समन्वय साधून प्रचारात आघाडी घेण्यासाठी काही वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली.
या नेत्यांवर सोपविली जबाबदारी
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुकुल वासनिक यांना रामटेक मतदारसंघ सांभाळायचा आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर औरंगाबादची जबाबदारी देण्यात आली आहे.
अमित देशमुख यांना लातूर मतदारसंघ सांभाळायचा आहे.
माजी मंत्री नितीन राऊत यांच्याकडे यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर सोलापूर मतदारसंघाची जबाबदारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
COMMENTS