नवी दिल्ली – सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन केंद्रात सरकार स्थापन करावे व त्याला काँग्रेसने पाठिंबा द्यावा, तसेच काँग्रेसला जास्त जागा मिळाल्यास प्रादेशिक पक्षांनी त्यास पाठिंबा द्यावा आणि मला उपपंतप्रधानपद देण्यात यावे, अशी मागणी राव यांनी केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे. चंद्रशेखर राव यांनी आज द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली. या भेटीमध्ये चंद्रशेखर राव यांनी स्टॅलिन यांच्यासमोर हे दोन प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे.
दरम्यान स्टॅलिन यांनी राव यांच्या पहिला प्रस्तावाला नकार दिला असल्याची माहिती आहे. त्यांनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे चंद्रशेखर राव यांनी केलेल्या उपपंतप्रधानपदासाठी मागणीला इतर पक्ष पाठिंबा देतील का हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS