नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘हम निभाएंगे’ असं जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर जनतेला आश्वासन देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यात शेतकरी, दलित, महिला आणि तरूणांना यामध्ये प्रधान्य देण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण यासह अनेक मुद्यांचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. यावेळी मंचावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आणि सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. तसेच २०३० पर्यंत भारत गरिबमुक्त करू असे अश्वासन यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिले.
दरम्यान जाहीरनाम्यात देशातील प्रत्येक घटकाचा विचार करण्यात आला आहे. तसेच यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, काँग्रेस देशातील बेरोजगारीवर काम करणार असल्याचं काँग्रेसचे नेते चिदंबरम यांनी म्हटलं आहे.१२१ ठिकाणावर भेट देऊन जाहीरनाम्याची निर्मिती केली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस सत्तेत आल्यास मनरेगा योजनेअंतर्गत 100 ऐवजी 150 दिवसांचा रोजगार देणार असल्याचं म्हटलं आहे.
तसेच पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणणार असून शिक्षणावर जीडीपीच्या 6 टक्के खर्च करणार आहे. मार्च 2020 पर्यंत 22 हजार पदे भरली जाणार असून गरिबीवर वार, 72 हजार, अशी घोषणा यावेळी राहुल गांधी यांनी केली. तसेच काँग्रेस पार्टी मार्च 2020 पर्यंत देशातील सरकारी खात्यात 22 लाख नोकऱ्या देणार असुन 10 लाख युवांना ग्रामपंचायतीत नोकऱ्या, काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार, गरिबांसाठी किमान उत्पन्न देण्याची काँग्रेसची हमी, गरिबांचं किमान उत्पन्न 72 हजार करु असं आश्वासनही यावेळी राहुल गांधी यांनी दिलं आहे.
Delhi: Congress party releases their election manifesto for #LokSabhaElections2019 pic.twitter.com/fccNKOuSqZ
— ANI (@ANI) April 2, 2019
COMMENTS