काँग्रेसची बैठक संपली, आगामी निवडणुकीबाबत महत्त्वाचे निर्णय !

काँग्रेसची बैठक संपली, आगामी निवडणुकीबाबत महत्त्वाचे निर्णय !

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस नेत्यांनी मुंबईत बैठक घेतली.ही बैठक विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या निवासस्थानी पार पडली असून या बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वड्डेटीवार, बाळासाहेब थोरात यांसह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 16 तारखेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र बैठक होणार असून वंचित आघाडीला सोबत घेण्याबाबतचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

दरम्यान16 तारखेला राष्ट्रवादीबरोबर चर्चा आहे, वंचितबाबत राष्ट्रवादीबरोबर चर्चा करून नंतर वंचितशी संपर्क केला जाणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे. राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांबरोबर चर्चा करायची त्याबाबत अंतर्गत चर्चा केली. तसेच 16 तारखेच्या बैठकीत दोन्ही पक्षातील जागावाटप आणि कोणत्या जागा मित्र पक्षांना सोडायच्या याबाबतही चर्चा केली जाणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपा शिवसेनेच्या संपर्कात असल्याबाबत विचारले असता भाजपाने संपूर्ण देशात पायंडा पाडला आहे.अन्य पक्षातील उमेदवारांना तिकीट आणि पैसेही देतायत. केंद्रात सरकार आल्यापासून त्यांनी हे सुरू केलं आहे. त्यांचे आज दिवस आहेत, उद्या दिवस बदलले की त्यांना समजेल असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

COMMENTS