काँग्रेस आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश, राहुल गांधी जातीय राजकारण करत असल्याची टीका !

काँग्रेस आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश, राहुल गांधी जातीय राजकारण करत असल्याची टीका !

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे मतांसाठी जातीय राजकारण करत असल्याची टीका करत गुजरातमधील काँग्रेसचे आमदार कुवरजी बवालिया यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला असून त्यानंतर त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. बवालिया हे चार वेळा आमदार राहिले असून सध्या ते राजकोट जिल्ह्यातील जसदान मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००९ मध्ये ते लोकसभेवरही निवडून गेले होते.

दरम्यान कुवरजी बवालिया यांनी १५ दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कामकाजाविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु यानंतरही पक्षाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं बोललं जात आहे. तसेच कुवरजी बवालीया यांना विजय रुपाणी यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात येणार असल्याची शक्यत वर्तवली जात आहे.

दरम्यान बवालिया हे गुजरातमधील कोळी समाजातील नेते असून गुजरातच्या ६ कोटींच्या लोकसंख्येत कोळी समाजाचे प्रमाण २२ टक्के आहे. या समाजात बवालिया यांचा दबदबा आहे. त्यामुळे काँग्रेसला बवालिया यांच्या रुपात मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS