काँग्रेसच्या बंडखोर आमदारानं घेतली महाजनांची भेट, बंद दाराआड 40 मिनीटे चर्चा !

काँग्रेसच्या बंडखोर आमदारानं घेतली महाजनांची भेट, बंद दाराआड 40 मिनीटे चर्चा !

मुंबई – काँग्रेसच्या बंडखोर आमदारानं आज भाजप नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी ही भेट घेतली असून ते लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी जवळपास 40 मिनीटे बंद दाराआड चर्चा केली आहे. या भेटीत प्रवेशाची तारीख फिक्स करण्याबाबत चर्चा करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मागील आठवड्यात सत्तार यांनी विखेंची भेट घेतली होती. विखेंच्या बरोबर सत्तार देखील पक्षप्रवेश करणार आहेत, असं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच सत्तार आणि विखे यांच्याबरोबरच काँग्रेसमधील इतरही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट सत्तार यांनी केला होता. त्यानंतर आज सत्तार यांनी महाजनांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी इतर कोणकोणते आमदार भाजपमध्ये येतील याबाबतही चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे. परंतु या आमदारांची नावे अजून समजू शकली नाहीत.

COMMENTS