कोल्हापूर – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राज्यातील काँग्रेस संपवून बदला घेत आहेत, असा आरोप काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
आदर्श घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्याने अशोक चव्हाण हे राज्यातील काँग्रेस संपवून बदला घेत आहेत. चांगले काम करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची वेळ काँग्रेसवर आली असेल तर त्यांनी आत्मचिंतन करावे,’ अशी टीकाही आमदार नीतेश राणे यांनी केली आहे.
दरम्यान मुंबईत शुक्रवारी होणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काँग्रेस आमदारांवर कारवाई केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील, नीतेश राणे यांची नावे आघाडीवर आहेत. याबाबत नितेश राणे यांनी चव्हाणांवर टीका केली आहे. ‘कोणते आमदार घेऊन महाराष्ट्रात काम करायचे आहे ते चव्हाण यांनी ठरवावे. आदर्श घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्याने ते राज्यातील काँग्रेस संपवून बदला घेत आहेत. चांगल्या आमदारांवर कारवाईची करण्याची वेळ आल्याने त्यांनी आत्मचिंतन करावे असं राणे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS