मुंबई – काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर विखेंसोबत काँग्रेसचे आठ ते दहा आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी यापूर्वीच फारकत घेतली असून कालिदास कोळंबकर भाजपाच्या संपर्कात आहेत. तसेच विखे यांच्याबरोबर अब्दुल सत्तार, जयकुमार गोरे, भारत भालके, गोपाळ अग्रवाल, सुनील केदार, भारत भालके, चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे,आमदार गोपाळ अग्रवाल, सुनील केदार यांनीही विखेंची भेट घेतल्याने तेही भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान मागील आठवड्यात विखे पाटील यांची भेट घेणार्या भाजप प्रवेशाबाबत काँग्रसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण भाजपात जाणार नाही, तसेच विखेंनी भाजपात जाऊ नये, काँग्रेसमध्येच रहावे अशी विनंती करण्यासाठी आपण त्यांना भेटलो होतो असं राहुल बोंद्रे यांनी म्हटलं आहे.त्यामुळे राहुल बोंद्रे भाजपमध्ये जाणार नसल्याचं दिसत आहे.
COMMENTS