नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जवाहर चावडा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. चावडा यांनी गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांची भेट घेऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. काँग्रेसला रामराम केल्यानंतर चावडा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान अंतर्गत वादामुळे चावडा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. तसेच काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर, ललित वसोया, सोमभाई पटेल, धवल झाला हे नेते काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर याठिकाणी काँग्रेसला मोठा धक्ता बसणार असल्याटं दिसत आहे.
Gujarat: Congress MLA Jawahar Chavda tenders his resignation to Speaker Assembly Rajendra Trivedi pic.twitter.com/9IkjBDcRGJ
— ANI (@ANI) March 8, 2019
COMMENTS