इंदोर – मध्य प्रदेशात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन मुख्य पक्षांनी त्यांचे बहुतेक उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे उमेदवार कामाला लागले आहेत. उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. काँग्रसचे इंदोरमधील राऊ या मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार जीत पटवारी यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. पटवारी यांनी काल काही मतदारांच्या घरी भेट देऊन मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी एका मतदाराकडे त्यांनी आपको मेरी इज्जत रखणी है, पार्टी गई तेल लेने अशा प्रकारचं वक्तव्य केलं. मोबाईलवर हे कुणीतरी शूट केलं आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.
जर एखादा उमेदवार पक्षाबद्ल असा बोलत असेल तर त्याची पक्षावर काय निष्ठा असेल ? आणि तो निवडणू आला तरी पक्षाला त्याचा काय फायदा आहे. केवळ आकड्या गणितामध्ये एकाची भर पडले एवढाच तो काही फायदा असेल. पक्ष वाढवणे असेल किंवा पक्षाचे विचार तळागाळात पोचवणे असे आमदार करण्याची सुताराम शक्यता नाही. त्यामुळे पक्षाने उमेदावीर देताना अशा उमेदवारांना टाळायला हवे. पक्षही हल्ली, कोणताही विचार न करता केवळ निवडूण येण्याची क्षमता या एकाच निकषावर उमेदवारी देतात. त्यामुळे सगळाच आनंदी आनंद आहे. असंच म्हणावं लागेल.
COMMENTS