मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असलेले पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके हे आता राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत. आमदार भारत भालके यांचा आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित प्रवेश होणार आहे. भारत भालके 3 ऑक्टोबरला राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः माध्यमांना दिली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भारत भालके हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये जातील असंही बोललं जात होतं. त्यांनी इच्छुकांच्या मुलाखतीलाही अनुपस्थिती लावली होती. त्यामुळे ते भाडपमध्ये जातील अशी चर्चा होती. परंतु ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
COMMENTS