मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामा देणार ?

मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामा देणार ?

मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काँग्रेस आता राजीनामा अस्त्र उगारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेसच्या सर्व आमदारांनी राजीनामे देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच या प्रस्तावाला सर्व आमदारांनी एकमुखाने होकार दिला असल्याची माहिती आहे. परंतु याबाबत अजून निर्णय झाला नसून काँग्रेस आमदारांच्या भावना तीव्र असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसचे सर्व आमदार राजनामा देणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान आज घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेनेनं मागासवर्गीय अहवालाची वाट न पाहता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर लगेच काँग्रेस आमदारांनी राजीनामा अस्त्र उगारण्याचे नक्की केल्यामुळे राज्य सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS