मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यास पुन्हा काँग्रेसनं विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि उत्तर पश्चिम मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी जाहीर केली आहे. मनसेसाठी राष्ट्रवादी आग्रही असली, तरी काँग्रेसचा त्याला सक्त विरोध राहील. मनसेची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका पूर्णपणे विरोधी असून, मनसेच्या भूमिकेचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही.” असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत आघाडीत मनसेला घेण्यास काँग्रेसनं विरोध दर्शवला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेला आघाडीत स्थान दिलं जाईल असे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिले होते. परंतु पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यास काँग्रेसनं विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थितीत आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही. मनसेचा आघाडीला फायदा होताना दिसला नसल्याचं मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि उत्तर पश्चिम मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
COMMENTS