मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अखेर ठरलं असून
या दोन्ही पक्षांमध्ये जवळपास २०० जागांवर एकमत झालं असल्याची माहिती आहे. बुधवारी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. त्यात विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा करण्यात आली. या बैठकीत विद्यमान जागा व ज्या ठिकाणी मागील निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली परंतु आता परिस्थिती चांगली आहे अशा जवळपास १०० जागांवर चर्चा झाली. तेवढ्याच जागा राष्ट्रवादीच्याही अंतिम होत आल्या आहेत. त्यामुळे 200 जागांवर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालं असल्याची चर्चा आहे.
दरम्यान पुढील चर्चा करण्यासाठी येत्या १६ जुलै रोजी मुंबईत दोन्ही पक्षनेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उर्वरित ८८ जागांसाठी मित्रपक्षांशी काय बोलणी करायची यावर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या मित्रपक्षाला किती जागा देणार तसेच वंचित बहूजन आघाडीला सोबत घेण्याबाबतही या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, तर राष्ट्रवादीकडून विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुनील तटकरे, छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत.
COMMENTS