विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 50 उमेदवारांची यादी तयार!

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 50 उमेदवारांची यादी तयार!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
बीडमधून संदीप क्षीरसागर,गेवराईतून विजयसिंह पंडित,माजलगावमधून प्रकाश सोळंके,केजमधून नमिता मुंदडा,तर परळीमधून धनंजय मुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या 50 उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असल्याची माहिती आहे.

दरम्यान काँग्रेसच्या ५० उमेदवारांची पहिली यादी २० सप्टेंबर रोजी जाहीर होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस १२५, राष्ट्रवादी १२५ आणि मित्रपक्ष ३८ जागांवर लढणार आहे. आता काँग्रेसची पहिली यादी २० सप्टेंबरला येईल असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

राज्यातली बदलती समिकरणं लक्षात घेऊन आघाडीतील काही जागांची अदलाबदलही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर काँग्रेसच्या राज्यातल्या बड्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरा असा आदेश काँग्रेस श्रेष्ठींनी दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. जे नेते कधी विधानसभा निवडणूक लढले नाहीत त्यांनाही मैदानात उतरविण्याचा काँग्रेसचा विचार आहे. मात्र हे नेते हा आदेश ऐकणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS